'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 22, 2024, 12:21 PM IST
'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण
bollywood actress Nimrat Kaur Opens Up About Her School Love Abhishek Bachchan Says this watch Throwback video

Abhishek Bachchan Aishwarya Rai : स्टार सेलिब्रिटी जोडी, अशी ओळख असणाऱ्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी बराच जोर धरला आहे. त्यातच आता अभिषेकचतं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं जात असल्यामुळं या दोघांमध्ये आता तिसऱ्या नावाचीही तितकीच चर्चा सुरु आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बिग बींच्या कुटुंबात सध्या एक वादळ घोंगावत असल्याचं काहींचं म्हणणं, तर काहींच्या मते अभिषेक सध्या एका अभिनेत्रीच्या जास्तच जवळ असल्यानं ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे, निम्रत कौर. चौकटीबाहेरच्या आणि काहीशा आव्हानात्मक पण तितक्याच लक्षवेधी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीसह अभिषेकचं नातं कैक चर्चांना वाव देत आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. 

निम्रतने दिलेली प्रेमाची कबुली?

अभिषेक बच्चन आणि निम्रतनं 'दसवी' चित्रपटातून स्क्रीन शेअर केली होती, जिथं ती त्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान निम्रत तिच्या शालेय जीवनातील Live Life विषयी अगदी मोकळेपणानं बोलली. शालेय जीवनातील काही कमाल दिवस आठवताना निम्रत म्हणाली, 'मला फार काही सांगायचं नाहीये, कारण आता त्या मुलाचं लग्न झालंय आणि त्याला मुलंही आहेत. मी आता काहीही बोलणं योग्य नसेल. कारण, असं केल्यास मी त्याला अडचणीत टाकेन...'

हेसुद्धा वाचा : बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'

आपल्या शाळेतील 'त्या' खास मित्राविषयी सांगताना निम्रत म्हणाली होती, तो अतिशय लाजाळू होता. पण, खूप गोड मुलगा होता. तो मला केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी मगत करत असे. इथं निम्रत तिच्या जीवनातील खास व्यक्तींविषयी सांगत असतानाच तिथं अभिषेकही तिची खिल्ली उडवत होता. निम्रत आणि अभिषेकच्या या मुलाखतीतील अनेक किस्से आणि व्हिडीओ व्हायरल होत असून, आता या कथित जोडीवरच सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More