मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आपल्यापैकी बरेच लोक ट्रेनने प्रवास करतात. कारण हा प्रवास सोयीस्कर आणि सर्वांनाच परवडणारा असतो. तसेच ट्रेनमधील कन्फर्म तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला आगाऊ तिकीट बुक करावी लागते. परंतु बऱ्याचदा होतं असं की, काही कारणास्तव तिकीट बुक केलेला व्यक्ती हा ट्रेनने प्रवास करु शकत नाही. त्यावेळी तो आपली तिकीट एक तो रद्द करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या नियमाप्रमाणे एका व्यक्तीच्या नावाच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास करु शकत नाही. परंतु रेल्वेचा असा एक नियम आहे, ज्यामुळे तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ट्रान्सफर करू शकता.


चला तर मग रेल्वेच्या या विशेष सुविधाबद्दल आपण जाणून घेऊ या


रेल्वे प्रवाशांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो. तिकीट बुक केल्यानंतर ते जर रेल्वेने प्रवास करू शकत नसतील, अशा परिस्थितीत एकतर त्यांना तिकीट रद्द करावे लागते आणि त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीचे नवीन तिकीट घ्यावे लागते. परंतु असे केल्यानंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते.


त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. जरी ही सुविधा बर्याच काळापासून अस्तित्वात आहे, परंतु लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे.


रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


एक प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी विनंती किंवा रिक्वेस्ट करावी लागेल.


यानंतर, तिकिटावर प्रवाशाचे नाव कापले जाते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले गेले आहे, त्याचे नाव टाकले जाते.


अर्ज २४ तास अगोदर द्यावा लागेल


जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि त्याच्या ड्युटीसाठी जात असेल, तर तो ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करू शकतो, ज्या व्यक्तीसाठी विनंती केली आहे त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल.


परंतु काही लोक असे असतात जे लग्नाकार्यासाठी किंवा फिरण्यासाठी वैगरे जात असतात, तर अशा लोकांना कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागेल. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता.


भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की, तिकिटांचे हस्तांतरण फक्त एकदाच केले जाऊ शकते, म्हणजे, जर प्रवाशाने त्याचे तिकीट दुसर्‍या व्यक्तीला एकदा हस्तांतरित केले असेल, तर तो ते बदलू शकत नाही, म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही हस्तांतरित केले जाऊ शकत नाही.


ट्रेनचे तिकीट कसे ट्रान्सफर करावे?


1. तिकिटाची प्रिंट काढा.
2. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरला भेट द्या.
3. ज्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे, त्याचा आधार किंवा मतदान ओळखपत्र यांसारखे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
4. काउंटरवर तिकीट हस्तांतरणासाठी अर्ज करा.