Indian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी.
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : अवघ्या काही दिवसांवरच दिवाळी येून ठेपलेली असतानाच हे आनंदपर्व साजरा करण्यासाठी सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे. आपल्या घराची स्वच्छता करण्यापासून अगदी पाहुण्यांना घरी जेवणासाठी बोलवण्याचे बेतही आखले जात आहेत. तर, काही मंडळी कामाच्या निमित्तानं मूळ घरापासून दूर असल्यानं त्यांनी स्वगृही परतण्याची लगबग सुरु आहे.
दिवाळीदरम्यानच्या या प्रवासासाठी अनेकांच्याच पसंतीचं माध्यम म्हणजे रेल्वे. याच रेल्वेनं सणासुदीला प्रवास करत असताना प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानाचं ओझं नेहमीपेक्षा जास्त असतं. दिवाळीला या सामानामध्ये भर पडते, ती म्हणजे फटाक्यांची. पण, रेल्वे प्रवासादरम्यान फटाके नेता येतात का?
रेल्वे प्रवासादरम्यान फटाके किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ सोबत नेणं किंवा सोबत बाळगणं धोक्याचं ठरु शकतं. त्यामुळं तुमच्याकडे फटाके असल्यास चुकूनही रेल्वे प्रवास करु नका. नियमांमध्ये अशी नोंद असून, या नियमांचं उल्लंघन करणाऱ्य़ांना शिक्षाही होऊ शकते.
हेसुद्धा वाचा : सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...
नियम काय सांगतो?
भारतीय रेल्वेमध्ये लागू नियमावलीनुसार रेल्वे प्रवासादरम्यान फटाके नेणं बंधनकारक आहे. फटाक्यांमध्ये स्फोटकं असल्यामुळं हा नियम लागू असून या स्फोटकांमुळं इतर प्रवाशांनाही धोका उदभवत असल्यामुळं रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफकडून हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत प्रवाशांच्या समानाची तपासणीही केली जाते.
एखादी व्यक्ती रेल्वेप्रवासादरम्यान फटाके नेताना दिसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. रेल्वेच्या कलम 164 अंतर्गत ही व्यक्ती शिक्षेस पात्र असून, त्यांना 1000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांचा कारावास अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. फटाक्यांमध्ये असणाऱ्या स्फोटकांमुळं अनेकदा प्रवासादरम्यान मोठा स्फोट होऊन संकट ओढावण्याचा धोका असतो. यामध्ये रेल्वेसह प्रवास करणारे प्रवासीही धोक्यात असतात. त्यामुळं सणासुदीला किंवा इतर कोणत्याही प्रसंगी रेल्वेनं प्रवास करत असाल तर चुकूनही सामानात फटाके नेऊ नका, नाहीतर होईल पश्चाताप.