Indian Railway : रेल्वे तिकीट बुक करत असताना पहिल्या झटक्यात ज्यांना Confirm तिकीट मिळतं ती मंडळी खऱ्या अर्थानं नशिबवान असतात असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, रेल्वेचं तिकीट रिझर्व्हेशन करायचं म्हटलं की तत्काळ, आरएसी वगैरे वगैरे शब्द वापरून नेमकी तिकीटच उपलब्ध नाहीये असं तुम्ही अनेकांना सांगताना पाहिलं असेल. पण, नेमक्या या तत्काळ तिकीटीसुद्धा का उपलब्ध कशा नसतात? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? देशात घडलेल्या एका घटनेमुळं या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. 


एका घटनेमुळं बिंग फुटलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वोत्तर रेल्वे विभागाच्या थावे जंक्शनवर आरपीएफच्या पथकानं स्टेशन तिकीट बुकिंग एजेंट (एसटीबीए) ला ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्याकडे दोन तत्काळ तिकीटी आढळल्या. याशिवाय मोबाईल आणि इतरही काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. ज्यानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार थावे जंक्शन रेल्वे स्थानकावर महमद रहीमुद्दीन रेल्वेच्या तत्काळ काऊंटवरून आरक्षित तिकीटांचा अवैध व्यवहार करत होता. 


आरपीएफच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षक सुधीर कुमार यांनी महमद रहीमुद्दीनची चौकशी केली जिथं त्यानं आपण हे काम करत असल्याचं स्वीकारलं. सदरील इसमाची झाडाझडती घेतल्यास त्याच्या पाकिटातून रेल्वेचं तत्काळ तिकीट आढळलं. प्राथमिक माहितीनुसार 1730 रुपयांचं हे तिकीट स्लीपर कोचचं असून आसन क्रमांक 17 आणि 18 साठी आरक्षित करण्यात आलं होतं. 


हेसुद्धा वाचा : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का? 


आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरपीएफनं त्याच्याकडून तिकीट आणि मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटची प्रत जप्त केली. छपरा ते मुंबई या लोकमान्य रेल्वेतून प्रवास करण्यासाठीचं हे तिकीट होतं. सदर प्रकरणी आरोपीला चौकशीसाठी सोनपुर रेल्वे न्यायालयात नेण्यात आलं होतं. 


यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफनं खिडकी क्रमांक 2 च्या रोकडीची तपासणी केली. यातून समोर आलेल्या माहितीनुसार एकुण तिकीटाची विक्री 14 हजार 665 रुपये इतक्या रकमेची होती. यामध्ये 873 रुपये कमी असल्याची बाब लक्षात आली. दरम्यान, आरोपीकडून मिळालेल्या व्हॉट्सअप चॅटमधून या तिकीटाचा खुलासा झाला. हा इसम मागच्या काही महिन्यांपासून गरजवंत प्रवाशांना 300 ते 400 रुपये जास्त आकारून तिकीट विक्री करत होता.