जलद आणि सोपे रेल्वे तिकीट आरक्षण, जाणून घ्या ही गुडन्यूज
तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवास करण्याआधी तिकीट मिळणे जिकरीचे होते. अनेकवेळा आरक्षण फुल्ल असते. आता रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. यामुळे तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होईल.
नवीन वेबसाइटमध्ये सुलभ लॉग-इन आणि नेव्हिगेशन सुविधा असेल. तिकीट बुकींग करताना वेळ निघून जाते. त्यामुळे तिकीट बुकिंग करता येत नाही, ही समस्या कायम येते. नवीन वेबसाइट आणि अॅपद्वारे रेल्वे आपला व्यवसाय वाढीसाठी ही तयारी करत आहे.
उशिर होत असेल तर अॅलर्ट मिळणार
जर रेल्वे गाडी उशिरा येणार असेल किंवा वेळेवर नसेल तर याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी खास अॅलर्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासाच्यावेळी स्टेशनवर गाडीच्या वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यासाठी एक अॅलर्ट पाठविले जाईल आणि प्रवासी स्टेशनला सहज पोहोचू शकेल.
नवीन फीचर्समुळे प्रवाशांना तिकिटाची पुष्टी करण्याची तारीख दिली जाईल जेणेकरून ते सहजपणे त्यांच्या स्वतःच्या प्रवासाची योजना आखू शकतील. तसेच याशिवाय तत्काळ सेवांचा दुरुपयोग कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रवासा दरम्यान काही उशीर झाल्यास प्रवाशांना मोबाईल फोनवर मजकूर अॅलर्ट पाठविले जाईल. त्यामुळे उशिर होणार असल्याने पुढील रेल्वे स्थानक आणि आपल्या मुक्कामाच्या दिशेने येण्याच्या वेळेची माहितीही दिली जाणार आहे.
रेल्वे ही नवी यंत्रणा सुरु करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या मदतीने उपग्रहाची मदत घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उपग्रहाद्वारे रेल्वेचे प्रत्यक्ष स्थान सांगता येणार आहे.
रेल्वे काय सांगते?
या मदतीमुळे कोणत्याही रेल्वेगाड्याचा स्थान रिअल टाईमवर मागोवा घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या, लोकल स्थानक अधिकाऱ्याच्या माहितीवर अवलंबून राहता येणार आहे. उपग्रहाद्वारे अचूक लोकेशन मिळणार आहे. आयआरसीटीसीव्यतिरिक्त अन्य प्रवासी संकेतस्थळ हे अगदी सोपे आणि जलद आहे, हे मान्य करेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.