रेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Indian Railways Train Ticket: आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेने प्रवास केला असेल. तसेच काही जण रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देतात. रेल्वे प्रवास करत असाल तर ट्रेनच्या तिकिटाची माहिती असणे गरजेचे आहे. तिकीट बुकिंगशी संबंधित नियम रेल्वेने वेळोवेळी बदलले आहेत. परंतु त्याआधी तुम्हाला ई-तिकीट आणि आय-तिकीटबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या तिकिटांचा अर्थ काय आहे?
हे तिकीट ऑनलाइन बुकिंगमध्ये उपलब्ध
रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रवाशाला तिकीट आवश्यक असते. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. Pan-Aadhaar Link: नाव आणि पत्ता यांसारख्या चुकीच्या गोष्टींमुळे पॅन-आधार लिंक होत नाही? हे करा काम
ई-तिकीट म्हणजे काय?
ई-तिकीट हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक प्रिंटेड तिकीट आहे. कोणताही प्रवासी त्याच्या सोयीनुसार हे तिकीट प्रिंट करु शकतो. हे तिकीट तुम्ही काउंटरवर न जाता घरी बसून बुक करु शकता. इंटरनेटच्या मदतीने ते ऑनलाइन बुक केले जाते. ते रेल्वे काउंटरच्या तिकीटाप्रमाणेच वैध मानले जाते. सध्या जे लोक ई-तिकीटद्वारे प्रवास करतात त्यांच्याकडे त्यांचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सावधान ! तुम्हीही कोल्ड्रिंक्स पिताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..
आय-तिकीट म्हणजे काय?
जर आपण आय-तिकीटबद्दल बोलायचे झाले तर ते रेल्वेकडून प्रवाशांच्या पत्त्यावर कुरिअर केले जाते. हे तिकीटही फक्त इंटरनेटद्वारेच बुक केले जाते. IRCTC वेबसाइटवर नोंदणी करताना, हे तिकीट दिलेल्या पत्त्यावर कुरिअर केले जाते. हे तिकीट येण्यासाठी सुमारे 48 तास लागतात.
ई-तिकीट आणि आय-तिकीटमधील फरक
- ई-तिकीट प्रवाशाद्वारे छापले जाते तर आय-तिकीट छापले जाऊ शकत नाही.
- आय-तिकीट रेल्वेकडून कुरिअर केले जाते, तर, तुम्हाला ई-तिकीट लगेच मिळते.
- डिलिव्हरी चार्ज देखील आय-तिकीटाशी संलग्न आहे, ज्यामुळे ते महाग आहे.
- आय-तिकीट दोन दिवस अगोदर बुक करावे लागेल.
- ई-तिकीट त्याच दिवशी बुक करता येईल.
- सीट अर्थात बर्थ कन्फर्म किंवा ई-तिकीटमध्ये आरएसी.
- आय-तिकीटमध्ये कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंग या तिन्ही श्रेणींमध्ये मिळू शकते.