आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..

Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज  30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे.

| Jun 30, 2023, 15:24 PM IST
1/5

पॅन-आधार कार्डला लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस...लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द होणार.

2/5

पॅनला आधारशी लिंक करताना

पॅनला आधारशी लिंक करताना

पॅनला आधारशी लिंक करताना या काही कारणांमुळे अडचण येऊ शकते. डेमोग्राफिक माहिती जुळत नाही. दुसरे म्हणजे जन्मतारीख वेगळी असणे. तसेच लिंग बदल. (उदा. पुरुष, महिला)

3/5

सर्वप्रथम पॅन आणि आधारमध्ये समान माहिती अपडेट करा

सर्वप्रथम पॅन आणि आधारमध्ये समान माहिती अपडेट करा

स्टेप 1 - तुमची पॅन आणि आधार माहिती वेगळी असल्यामुळे तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर आधी पॅन कार्डमधील माहिती अपडेट करा. यासाठी तुम्ही सर्वप्रथम onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकला भेट देऊन तुमची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.

4/5

स्टेप 2 - त्यानंतर UTIITSL pan.utiitsl.com वर जा. यानंतर, ssup.uidai.gov.in/web/guests/update या लिंकवर जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करा.

5/5

Aadhaar Pan Linking

स्टेप  3 - आता आधार आणि पॅन दोन्हीमध्ये माहिती अपडेट केली गेली आहे, तर तुम्हाला ती पुन्हा लिंक करावी लागेल. यासाठी तुम्हाला eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर जावे लागेल आणि पुढील प्रक्रियेचे अनुसरण करुन तुम्ही ते करु शकता.