मुंबई : दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची(Sarkari Naukri) चांगली संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेने झाशी येथे ट्रेड अ‍ॅप्रेंटीस (Indian Railway Vacancy 2021) च्या 480 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती (इंडियन रेल्वे रिक्रूटमेंट २०२१) फिटर (गॅस आणि इलेक्ट्रिक), मेकॅनिक (डीएसएल), सुतार, इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी केली जाईल.


अर्ज कसा करावा ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवार mponline.gov.in विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 4 एप्रिल 2021 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांने दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.



शैक्षणिक पात्रता


अप्रेंटीस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असावी. तसेच, आयटीआय प्रमाणपत्र ( NCVT मान्यता प्राप्त) पोस्ट संबंधित ट्रेनमध्ये असावे.


या पदांवर भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षांपेक्षा कमी असावेत. 5 मार्च 2021 पासून वय मोजले जाईल. जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि दिव्यांगांसाठी 7 ते 10 वर्षे सवलत देण्यात येईल.


निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल.


सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: 170 रुपये अनुसूचित जाती, जमाती व महिला उमेदवारांसाठी 70 रुपये शुल्क भरावा लागेल.


निवड प्रक्रिया


या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. निवडीसाठी दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व ट्रेन्डमध्ये प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षासाठी निश्चित करण्यात आला आहे.


एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव स्वीकारायचा कि नाही प्रशिक्षणार्थीने ठरवावे. प्रस्ताव स्वीकारण्याचे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसेल.