नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रकराच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरही याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास सव्रच वाहतूक ठप्प झाली. ज्यानंतर स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मुळ राज्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेन ही सुविधा सुरु केली. काही नियमांचं काटेकोरपणे पालन करत गेल्या काही दिवसांपासून देशाच्या बहुविध भागांतून रेल्वेने हजारोंच्या संख्येने मजुर आपआपल्या राज्यांत परतत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रमिक स्पेशल ट्रेनच्या याच सुविधेमध्ये आता भारतीय रेल्वेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जवळपास १२०० मजुरांना आपल्या राज्यांमध्ये नेणाऱ्या या रेल्वे सेवेअंतर्गत आता प्रवासी मजुरांची संख्या वाढवून १७०० इतकी करण्यात आली आहे. थोडक्यात श्रमिक रेल्वे सुविधेसाठी रेल्वेकडून प्रवासी संख्या वाढवण्यात आली आहे. 


निर्धारित मुख्य गंतव्य स्थानकाव्यरिक्त आता ही रेल्वे इतर तीन स्थानंकांवर थांबणार आहे, जिथे हे स्थलांतरित मजुर आपल्या सोयीनुसार उतरू शकतील. सूत्रांचा हवाला देत 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका दिवशी जवळपास ३०० रेल्वे सोडण्याची भारतीय रेल्वेची क्षमता असून, येत्या काळात ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल. ज्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त मजुरांना त्यांच्या राज्यात परतणं शक्य होणार आहे. 


वाचा : १२ मेपासून निवडक रेल्वेगाड्या सामान्य प्रवासी वाहतुकीसाठी सुरू


 


दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार रेल्वेमध्ये असणाऱ्या बर्थच्या बरोबरीनेच रेल्वे गाड्यांची संख्या असावी. श्रमिक स्पेशल ट्रेमध्ये एकूण २४ कोच आहेत. ज्यामध्ये ७२ मजुर प्रवास करु शकतात. या परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत श्रमिक स्पेशल ट्रेनच्या प्रत्येक कोचमधून ५४ मजुरांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येत आहे.