मुंबई :  'लक्झरी ट्रेन्स' मधून भारतीय रेल्वेला मिळणारी कमाई घटल्याने आता या लक्झरी ट्रेनच्या सेवादरात कपात करण्यात आली आहे. दर कमी केल्याने आता नवी सुविधा अनेक प्रवाशांच्या आवाक्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे बोर्ड पॉलिसी रिव्ह्यू मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 


कोणकोणत्या ट्रेनचा समावेश ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅलेस ऑफ व्हिल्स, महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, रॉयल ओरिएंट, गोल्डन चॅरिएट या ट्रेनच्या दरामध्ये 50% पर्यंत दर कमी करण्यात आले आहेत. 
पॅलेस ऑफ व्हिल्सचे दर 24% तर रॉयल राजस्थानचे दर 63% कमी करण्यात आले आहेत. 



ट्रेनमध्ये शाही अंदाज असल्याने अनेक पर्यटकांचा अशा ट्रेनमधून प्रवास करण्याचा मोह असतो. मात्र आता दरात कपात झाल्याने अधिक पर्यटक याचा आनंद लुटणार आहे. यामध्ये 336 सलोन कार्सचा समावेश आहे.