मुंबई : तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे. त्यामुळे तिकिट बूक करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तसा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचे अनावरण (IRCTC New Website Launch) आज दुपारी होणार आहे. IRCTC चं संकेतस्थळ आणि अॅप अपग्रेड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच्या तुलनेत अधिक वेगाना तिकीट बुक करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वेबसाइटवर प्रवाशांसाठी अधिक चांगले फिचर्स असतील. तसेच नव्या वेबसाइटवर अधिक लोड पडला तरी ती हँग होणार नाही, असेही IRCTC कडून सांगण्यात आले आहे. नव्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला १० हजारांहून अधिक तिकीट बुक होऊ शकतील. 


भारतीय रेल्वे (Indian Railways) आयआरसीटीसी (IRCTC) ई-तिकीट वेबसाइट आणि अ‍ॅप या दोन्ही श्रेणी सुधारित करणार आहे. आता यात तिकिट बुकिंगसाठी अधिक चांगली फीचर्स असतील. बुकिंगमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. 


रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाइट अपग्रेडनंतर तिकिट बुकिंगची गती वाढेल आणि प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत तिकीट बुक करता येणार आहे. यासह आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन खाण्यापिण्याच्या सोयीसह इतर सुविधा जोडल्या जातील.


भारतीय रेल्वेने सांगितले की आम्ही आमच्या ई-तिकीट वेबसाइटमध्ये वापरकर्ता वैयक्तिकरण आणि सुविधा वाढविण्याचे काम करीत आहोत. नवीन वेबसाइटवरून दर मिनिटाला १०,००० हून अधिक तिकिटे बुक केली जातील. तिकिट बुकिंगबरोबरच खाणे मागविण्यासाठी एक वेगळे फीचर्स असणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या आवडीचे खाद्य मागवून शकता.


आयआरसीटीसीने नवीन पोस्ट पेड पेमेंट पर्याय सुद्धा सादर केला आहे. या सुविधेद्वारेनंतर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन तिकिटे बुक करून तिकिटे भरता येतील. यात प्रवासी ई-पेमेंटद्वारे तिकिट बुक करुन १५ दिवसांच्या आत पेमेंट करू शकते किंवा तिकीट दिल्यानंतर २४ तासात पैसे भरता येणार आहेत.