नवी दिल्ली - भारतीय रेल्वेचे अनेक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकिटांचे बुकिंग करतात. अनेक वेळा एसी डब्यांसाठी अधिकचे पैसे मोजूनही प्रवाशांना समाधानकारक सुविधा मिळत नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास किंवा काही कारणास्तव एसीची सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआरसीटीसीच्या वेबसाईटमध्ये तसेच प्रवासाचे तिकीट रद्द केल्यानंतर परत मिळणाऱ्या रकमेच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. तिकीट रद्द केल्यानंतर त्याच्या प्रक्रिया शुल्कामध्येही बदल करण्यात आले आहेत. रेल्वे सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या ४८ तास आधी कन्फर्म असलेले तिकीट रद्द केले असेल तर त्याच्या दरातही बदल केलेले असतील. प्रथम वर्ग एसी डब्यासाठी तिकिटाच्या रकमेच्या २४० रूपये, एसी २ टिअरसाठी २०० रूपये, एसी ३ टिअरसाठी १८० रूपये, स्लिपर क्लाससाठी १२० रूपये तर दुसऱ्या श्रेणीसाठी प्रत्येक तिकिटामागे ६० रुपये कापून उर्वरित रक्कम प्रवाशांना जाणार आहे.


दरम्यान, प्रवाशाने एसी डब्याचे तिकीट बुक केले असेल पण काही तांत्रिक कारणास्तव एसी बुकींग न झाल्यास विनाएसीमधून प्रवास करावा लागल्यास प्रवासी टीडीआर(TDR)दाखल करून परताव्याची मागणी करू शकतात. तसेच टीडीआर ७२ तासांपर्यंत दाखल करून मूळ प्रमाणपत्र दिल्यानंतरच परताव्याची प्रक्रिया टीडीआरद्वारे पूर्ण केली जाणार आहे.