मुंबई : भारतात दररोज लाखो आणि कोटींच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही देशाची लाइफ लाइन मानली जाते. कदाचित तुम्ही ऐकलं असेल की पूर्वी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होत असे. चोरटे रेल्वेतून पंखे, बल्ब आदी वस्तू चोरून नेत. आता असं केल्यास तुम्हाला दीर्घकाळ तुरुंगात जावे लागू शकते. पूर्वीच्या काळी ट्रेनमधून पंखे चोरीला जाणं सामान्य होतं. यानंतर भारतीय रेल्वेनं यावर उपाय शोधला, मग चोरांना इच्छा असूनही ट्रेनचा पंखा चोरता आला नाही. ही कोणती पद्धत आहे ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरीच्या वाढत्या घटना पाहता भारतीय रेल्वेनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. इंजीनियर्सनं पंखे अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते सामान्य घरांमध्ये चालू शकत नाहीत. तुम्ही त्यांचा वापर फक्त ट्रेनमध्ये करू शकता. हे पंखे बाहेर कुठेतरी वापरायचे असतील तर ते शक्य नाही. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. या मागचे कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. रेल्वेबाहेरी हे पंखे केवळ भंगार आहे. 


आपण आपल्या घरात दोन प्रकारची वीज वापरतो. फर्स्ट एसी (अल्टरनेटिव्ह करंट) आणि सेकंड डीसी (डायरेक्ट करंट), जर घरामध्ये एसी वीज वापरली जात असेल तर कमाल वीज 220 व्होल्ट असेल. दुसरीकडे, जर डीसी वापरलं जात असेल, तर वीज 5, 12 किंवा 24 व्होल्ट असेल. दुसरीकडे ट्रेनमध्ये बसवलेले पंखे 110 व्होल्टचे बनलेले असतात, जे फक्त डीसीवर चालतात. घरांमध्ये वापरलेली डीसी पॉवर 5, 12 किंवा 24 व्होल्टपेक्षा जास्त नसते, त्यामुळे तुम्ही हे पंखे तुमच्या घरात वापरू शकत नाही.


त्यामुळे ट्रेनमध्ये बसवलेले पंखे ट्रेनमध्येच चालू शकतात. त्यामुळे हे पंख चोरणे लोकांसाठी निरुपयोगी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रेन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. यामध्ये चोरी करणं म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणं आहे. असे केल्यावर आरोपींविरुद्ध कलम 380 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडही ठोठावला जाईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीन मिळत नाही.