मुंबई : सध्या सर्वत्र प्रवास करण्याचा ट्रेंड सुरू आहे, जो पाहातोय तो कुठे ना कुठे फिरायला जातोय आणि आपल्या सोशल मीडियावर (Indian Railways Latest News) फोटो शेअर करत आहे. जर तुम्हालाही प्रवास करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आयआरसीटीसी अशा लोकांना एक लाख रुपयांचे बक्षीस  (IRCTC Contest) देत आहे. यासाठी आपल्याला फक्त एक व्हिडीओ तयार करावा लागेल. आयआरसीटीसी Vlogers साठी एक विशेष स्पर्धा घेऊन आली आहे, ज्याद्वारे आपल्याला हे बक्षीस मिळेल. आयआरसीटीसी CoRoverच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करत आहे.


IRCTCकडून माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IRCTCने ट्वीटद्वारे अधिकृत माहिती दिली आहे की, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी Vlogersना भारतीय रेल्वे आणि तिकिट, कॅटरिंग, पर्यटन, हवाई, चॅटबॉट आणि पर्यटन स्थळांसारख्या अनेक विषयांवर व्हिडीओ बनवावे लागतील. या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. IRCTCने  ही स्पर्धा CoRoverच्या सहकार्याने आयोजित करीत आहे.


अर्ज कसा करावा?


या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, https://corover.ai/vlog/  या लिंकवर जाऊन स्पर्धक फॉर्म भरू शकतात.


तुम्हाला किती पैसे मिळेल?


या स्पर्धेत प्रथम विजेत्या स्पर्धकाला 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. याबरोबरच प्रमाणपत्र आणि ट्रॉफीही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसर्‍या क्रमांकाच्या विजेत्यास प्रमाणपत्र आणि ट्रॉफीसह 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 25 हजार रुपये देऊन प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.


या व्यतिरिक्त इतर सर्व विजेत्यांना 500 ​​रुपयांचे गिफ्ट कार्ड आणि प्रमाणपत्र दिले जाईल.


300 विजेत्यांची घोषणा केली जाईल


या स्पर्धेअंतर्गत 300 विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. सर्व राज्यातील लोक यात सहभागी होऊ शकतात. व्हिडीओची गुणवत्ता आणि content पाहिल्यानंतर विजेता घोषित केला जाईल.


IRCTCचा कॉपीराइट


याअंतर्गत तुम्हाला IRCTC CoRoverच्या सहकार्याने CoRover आणि महाराजा व्हिडीओवर तुमचा व्हिडीओ अपलोड करावा लागेल. व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्याचे IRCTCद्वारे कॉपीराइट केले जाईल. त्याला निर्मात्याचे नाव दिले जाईल आणि परंतु तुम्ही या व्हिडीओसाठी कधीही दावा करू शकत नाही.


व्हिडीओचे विषय


या व्हिडीओंसाठी आपण IRCTC टूरिझम, IRCTC Air, IRCTC iMudra अ‍ॅप आणि वेबसाइट, IRCTC ई-केटरिंग, RCTC SBI Card, IRCTC नवीन ई-तिकीट वेबसाईट, IRCTC बस बुकिंग, IRCTC तेजस ट्रेन, IRCTC सेवानिवृत्त खोली बुकिंग हे विषय तुम्ही वापरु शकता.