Platform Tikcet Fare : दक्षिण रेल्वेने गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय घेतला आहे.  Platform Tikcet तिकीट दरात होणार वाढ करण्यात आली आहे. नवीन तिकीट दर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल आणि 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीही अनेकदा तुमच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असाल तर या बातमीने तुम्हाला धक्का बसेल. खरं तर, दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे.(Southern Railway Raised Platform Ticket Fare)  दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की, आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपयांवरुन थेट 20 रुपये करण्यात आली आहे.


दक्षिण रेल्वेने दिलेल्या माहितीत असेही सांगण्यात आले आहे की नवीन दर हा 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल आणि 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू असेल. म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर 1 फेब्रुवारीपासून केवळ 10 रुपयांच्या जुन्या दराने प्लॅटफॉर्म तिकिटे उपलब्ध होतील. वास्तविक, या दिवसांत किमान लोकांना फलाटावर पाठवण्याचा रेल्वेचा निर्णय दिसून येत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळण्यात यश येईल, असा दावा करण्यात आला आहे.


या आठ स्थानकांवर नवीन दर लागू होणार


दक्षिण रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये केलेली वाढ चेन्नई विभागातील आठ प्रमुख स्थानकांवर लागू होणार आहे. या स्थानकांमध्ये चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर, तांबरम, कटपाडी, चंगलपट्टू, अरक्कोनम, तिरुवल्लूर आणि अवाडी यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आज पंतप्रधान मोदी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला अहमदाबादहून हिरवा झेंडा दाखवतील.


15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 75 शहरांना वंदे भारत ट्रेनने जोडण्याची सरकारची योजना आहे . यावर रेल्वेचे अधिकारी वेगाने काम करत आहेत. आगामी काळात शताब्दी, जनशताब्दी आणि इंटरसिटी एक्स्प्रेसच्या जागी वंदे भारत गाड्या आणण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसह प्रवास कमी वेळेत पूर्ण होणार आहे.