Indian Railways: आता Whatsapp वर मिळवा PNR आणि रेल्वे स्टेटस
Indian railway PNR status आता व्हॉट्सअॅपवर मिळवा रेल्वे संदर्भात सर्व माहिती.
Indian Railway status : व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपली अनेक कामे यामुळे खूप सोपी झाली आहेत. आज व्हॉट्सअॅपचा वापर व्यवसाय, शिक्षणापासून इतर अनेक क्षेत्रात होत आहे. व्हॉट्सअॅपमुळे आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. त्याचा वाढता वापर पाहता, भारतीय रेल्वेही व्हॉट्सअॅपवर आपल्या अनेक सुविधा देत आहे. अशा परिस्थितीत आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हॉट्सअॅपद्वारे ट्रेनचे लाईव्ह स्टेटस (Train Live Status) आणि त्यांचे पीएनआर स्टेटस (PNR Status) कळू शकणार आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रेनने प्रवास करतानाही ते ट्रॅक करू शकतील. (Get PNR status on whatsapp)
भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनशी संबंधित माहिती ट्रॅक करण्यासाठी इतर अॅप्स डाउनलोड करावे लागत होते. मात्र रेल्वेच्या या सुविधेनंतर त्यांना दुसरे कोणतेही अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही. या सर्वांची माहिती त्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सहज मिळू शकेल.
Indian Railway ची ही सुविधा तुम्हाला चॅटबॉटवर मिळते. येथे तुम्ही तुमचा 10 अंकी PNR क्रमांक टाकून थेट ट्रेनची स्थिती, PNR स्थिती, मागील रेल्वे स्थानक माहिती इत्यादी तपासू शकता. यासाठी तुम्हाला Railofy चा नंबर (9881193322) तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
Whatsapp उघडल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला हा नंबर तुमच्या व्हॉट्सअॅपवर सर्च करावा लागेल. चॅट विंडो उघडल्यानंतर, तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल आणि तो पाठवावा लागेल.
Railofi चॅटबॉट तुमच्या व्हॉट्सअॅपवर तुमच्या ट्रॅव्हल अलर्ट आणि ट्रेन प्रवासाशी संबंधित रिअल टाइम अपडेट्स पाठवेल. याशिवाय, प्रवासापूर्वीच तुमचा पीएनआर क्रमांक टाकून तुम्ही प्रवासाशी संबंधित नवीनतम अपडेट्स मिळवू शकता.