हरियाणा : देशातील सर्वात मोठा रेल्वेचा ड्रीम प्रोजेक्ट डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर कोविड काळातही पूर्ण होताना दिसतोय. पहिल्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम कोरिडोअर बनवले जात आहेत. या दोन्ही कोरिडोअरमध्ये पाचशे किलोमीटरचा ट्रॅक रेल्वेने आधीच बनवलाय. यामध्ये वस्तुंची वाहतुक सुरु आहे. तर पाचशे किलोमीटरचा ट्रॅक पुढच्या महिन्यापर्यंत बनून तयार होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिलं विद्युत रेल्वे टनल 
अरावलीच्या डोंगरामध्ये डबल डेकर रेल्वेच्या अनुशंगाने टनल बनवणे हे एक आव्हान असलं तरी एका वर्षात हे तयार होईल असे रेल्वेच्या डेडीकेटेड फ्रेटच्या अभियंत्यांनी सांगितले.


हे जगातील पहिलं विद्युतीकृत रेल्वे टनल असणार आहे. एका वर्षात काम पूर्ण होणं हा देखील एक रेकॉर्ड असेल. २०१९ मध्ये हे काम सुरु झालंय. 



हे टनल हरियाणाच्या मेवात तसेच गुरुग्राम जिल्ह्याला जोडते. तसेच अरावली रेंजच्या चढ्या भागातून जाते. जड वस्तुंची नेआण वेगाने व्हावी, प्रवासी ट्रेनच्या गतीमध्ये वाढ व्हावी हा यामगचा हेतू आहे. सध्या प्रवासी गाड्या आणि मालगाड्या एकाच ट्रॅकवरुन चालल्या आहेत.


पण दोन कॉरिडोअर सुरु झाल्यानंतर मालगाड्या नॉर्मल नेटवर्कच्या डीएफसी वर शिफ्ट होतील अशी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे जास्त प्रवासी गाड्या चालवल्या जातील आणि रेल्वेची संख्या देखील वाढेल.