Indian Railway | कन्फर्म लोवर बर्थसाठी टिकिट बुक करताना वापरा ही ट्रिक
इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर राहते. ट्रेनमध्ये प्रवास करताना सिनिअर सिटिजन्सला लोअर बर्थची प्राथमिकता दिली जाते
नवी दिल्ली : इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर राहते. ट्रेनमध्ये प्रवास करताना सिनिअर सिटिजन्सला लोअर बर्थची प्राथमिकता दिली जाते. परंतु अनेकदा सिनिअर सिटिजनच्या आग्रहानंतरही त्यांना मिडल बर्थ किंवा अप्पर बर्थ दिला जातो. त्यामुळे त्यांना प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागते. आता इंडियन रेल्वेने म्हटले आहे की, तुम्हाला लोअर बर्थ कधी मिळू शकतो?
सिनिअर सिटिजनला मिळणार लोअर बर्थ
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने भारतीय रेल्वेला विचारले की, मी सिनिअर सिटजन असूनही मला मिडल बर्थ मिळाला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करीत त्यांनी म्हटले की, या व्यवस्थेत सुधारण्याची गरज आहे.
IRCTC चे उत्तर
प्रवाशाच्या या प्रश्नावर IRCTCने म्हटले की, महोदय लोअर बर्थ/सिनिअर सिटिजन कोटा केवळ 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी तसेच 45 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी असतो. जेव्हा एकाच टिकिटात एक सिनिअर सिटजन आणि एक सामान्य प्रवाशी असेल त्यावेळी ही सिस्टिम लागू होत नाही. तसेच दोनपेक्षा अधिक सिनिअर सिटजन एकाच टिकिटात प्रवास करीत असतील तेव्हा देखील ही सिस्टिम लागू नसेल. म्हणजेच टिकिटातील एका प्रवाशाला लोअर तर एका प्रवाशाला मिडल बर्थ मिळू शकतो.