मुंबई : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सदैव तत्पर असते. ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना खालच्या बर्थला प्राधान्य दिले जाते. परंतु अनेक वेळा, तिकीट बुकिंग दरम्यान ज्येष्ठ नागरिक विनंती करूनही, त्यांना लोअर बर्थ ऐवजी मधली बर्थ तर कधी वरची बर्थ मिळते. यामुळे त्यांना प्रवास करणे कठीण होते. पण आता भारतीय रेल्वेने आता सांगितले आहे की, जेष्ठ नागरिकांना ही लोअर बर्थ कशी मिळेल ते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला, त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत, प्रवाशाने लिहिले, 'सीट ऍलोकेश करण्याचे तुमचे काय लॉजिक आहे? मी लोअर बर्थ प्राधान्य देत तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटे बुक केली होती, तेथे 102 लोअर  बर्थ उपलब्ध होते, तरीही मला मिडल बर्थ, अप्पर बर्थ देण्यात आला. आणि साइड लोअर बर्थ देण्यात आला. तरी आपण ते दुरुस्त करावे.'



IRCTC कडून उत्तर


IRCTC ने प्रवाशाच्या या प्रश्नावर ट्विटरवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. IRCTC ने उत्तर दिले की, 'सर, लोअर बर्थ/ज्येष्ठ नागरिक कोटा हा फक्त 60 वर्षे आणि त्याहून अधिक, आणि 45 वर्षे त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी निर्धारित केले जातात, परंतु त्यासाठी जेष्ठ नागरिक एकटे किंवा सोबतचा प्रवासी देखील जेष्ठ नागरिक असेल.'


RCTCने पुढे म्हटले की, 'जर दोनपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एक ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्याच्यासमोर दुसरा ज्येष्ठ नागरिक नसेल तर यंत्रणा त्याला या कॅटेगरीमध्ये धरणार नाही.'


म्हणजे प्रवास करणारा जेष्ठ नागरीक फक्त एकटाच असावा किंवा त्याच्या सोबतची व्यक्ती देखील जेष्ठ नागरीक असवी, तरच तुम्हाला या लोअर बर्थ कॅटॅगरीमध्ये तिकीट मिळेल.



भारतीय रेल्वेने गेल्या वर्षी कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवासाला परावृत्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह अनेक श्रेणीतील लोकांसाठी सवलतीची तिकिटे निलंबित केली होती. रेल्वेने असेही म्हटले आहे की, कोविड -19 विषाणूमुळे प्रसार आणि मृत्यूचा धोका या श्रेणीमध्ये सर्वाधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती मागे घेण्यात आल्या आहेत.


कोविड -19 संदर्भात सुरू असलेल्या आरोग्य सल्लागाराच्या दृष्टीने आणि प्रवाशांना अनावश्यक प्रवास करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने, विशेष वर्गाच्या या श्रेणींना सध्या बंद करण्यात आले आहे.