मुंबई : Indian Railways Rule | रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना कोणत्या वस्तू सोबत नेऊ नये. याबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. या वस्तू तुम्ही चुकूनही प्रवासादरम्यान सोबत बाळगल्या तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. किंवा तुरूंगवासही होऊ शकतो.


रेल्वेने ट्विट करून दिली ही माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेल्वेने या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे. रेल्वेने ट्विट केले आहे की, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे, हा दंडनीय अपराध आहे.


रेल्वे प्रवासावेळी ज्वलनशील पदार्थ बाळगताना प्रवासी आढळल्यास कायदेशीर कारवाईसह तुरुंगवासही होऊ शकतो. पश्चिम मध्य रेल्वेने म्हटले आहे की ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू वाहून नेणे हा रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 164 नुसार दंडनीय गुन्हा आहे. असे ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा प्रवासी आढळल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकतो. 


या वस्तूंना बंदी


रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार रॉकेल, सुकं गवत, स्टोव्ह, पेट्रोल, गॅस सिलिंडर, माचिस, फटाके या वस्तू प्रवाशांनी सोबत बाळगू नये. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेने हे नियम बनवले आहेत.


रेल्वे परिसरातही धूम्रपान बंदी


आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवाशाला रेल्वेच्या आवारात धुम्रपान करता येणार नाही. असे करताना प्रवाशी आढळल्यास त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय प्रवाशाला दंडही भरावा लागू शकतो.