नवी दिल्ली : विमानप्रवासादरम्यान काही गोष्टी सोबत न नेण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा काही वस्तू न आणणं बंधनकारकही असतं. पण, रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला माहितीये का रेल्वे प्रवासादरम्यानही काही गोष्टी सोबत नेणं धोक्याचं ठरु शकतं. (Indian Railways)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत नियम? 
भारतीय रेल्वेमध्ये फ्लाईटप्रमाणेच अवजड वस्तू नेण्यास मनाई आहे. एका ठराविक मर्य़ादेपुढे अवजड सामान रेल्वेनं नेता येत नाही. असं केल्याच प्रवाशांना काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. 


कोणत्या सामानावर निर्बंध? 
रेल्वेमध्ये नेता न येणाऱ्या सामानाची यादी मोठी आहे. यामध्ये स्फोटकं, धोकादायक वस्तू, ज्वलनशील पदार्थ, रिकामा गॅस, अॅसिड असे पदार्थ नेता येत नाहीत. याशिवाय तुम्ही स्कूटर, सायकल आणि बाईकही रेल्वेनं नेऊ शकत नाही. ज्या प्रवाशांना सोबत पाळीव प्राणी न्यायचे आहेत, ते त्यांना आपल्यासोबतच आसनावर ठेवू शकत नाहीत. यासाठी त्यांना वेगळी तिकीट काढावी लागू शकते. जिथं त्यांना ब्रेक वॅननं नेण्यात येतं. रेल्वेनं गॅस सिलेंडर नेण्यास सक्त मनाई असली तरीही वैद्किय कारणांसाठीचा सिलेंडर याला अपवाद आहे. 


कुटुंबातील सदस्याच्या तिकीटावर करु शकता प्रवास 
कोणा दुसऱ्याच व्यक्तीच्या तिकीटावर तुम्हाला रेल्वेनं प्रवास करता येत नाही. पण, तुम्हाला हे ठाऊक आहे का, की तुम्ही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या तिकीटावर प्रवास करु शकता. फक्त त्या व्यक्तीशी तुमचं थेट रक्ताचं नातं असणं गरजेचं आहे.