भारतीय रेल्वे होणार हायटेक, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करणार ड्रोनचा वापर...
ड्रोनच्या साहाय्याने रेल्वे अधिकारी स्टेशनवरील गर्दीवर लक्ष ठेवणार.
नवी दिल्ली : ड्रोनच्या साहाय्याने रेल्वे अधिकारी स्टेशनवरील गर्दीवर लक्ष ठेवणार.
करणार ड्रोनचा वापर
जमिनीवर घौडदौड करतांनाच भारतीय रेल्वेचा एक डोळा आता आकाशातूनही लक्ष ठेवणार आहे. रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर रेल्वे प्रशासन करणार आहे.
गर्दीचं व्यवस्थापन
ड्रोनचा वापर गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी केला जाणार आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात जेव्हा प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्या वेळेस गर्दीचं व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसंच धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल.
प्रकल्पांवर देखरेख
त्याबरोबरच रेल्वे रुळांची पाहणी करण्यासाठी, त्यावर देखरेख करण्यासाठी, रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी, आपतकालीन परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी ड्रोनचा वापर रेल्वे प्रशासन करणार आहे.
या संबंधीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून रेल्वे प्रशासनाने जबलपूरच्या तीन रेल्वे विभागांमध्ये ड्रोनचा वापर सुरू केला आहे.