मुंबई : Indian Railways: भारतीय रेल्वेद्वारे वाहतूक  (Indian railways Transport) करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू आहे. रेल्वेद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवला जाऊ शकतो. रेल्वेने बाइक किंवा स्कूटर कशी पाठवायची त्याबाबत जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे  (Indian railways) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही ज्या रेल्वेने प्रवास करता त्या  रेल्वेने तुम्ही तुमची बाईक दुसऱ्या शहरातही पाठवू शकता. भारतीय रेल्वेद्वारे वाहतूक करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू शकतो. रेल्वे कुरिअरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल सहज पाठवता येतो. रेल्वेने बाइक किंवा स्कूटरही पाठवली जाते.


वाहतुकीचे दोन मार्ग आहेत


भारतीय रेल्वेकडून कोणत्याही मालाची वाहतूक करण्याचे दोन मार्ग आहेत. सामानाच्या स्वरुपात किंवा पार्सलच्या स्वरुपात. सामान म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही जे सामान सोबत घेऊन जात आहात. तर पार्सलचा अर्थ असा आहे की तुम्ही वस्तू तुमच्या आवडीच्या ठिकाणी पाठवत आहात, परंतु त्यासोबत प्रवास करू शकत नाही.



पार्सल कसे करायचे?


बाईक पार्सल करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. तेथे तुम्हाला पार्सल काउंटरवरून पार्सलशी संबंधित सर्व माहिती दिली जाईल. माहिती मिळाल्यानंतर सर्व कागदपत्रे तयार करावी लागतील. कागदपत्रांची मूळ प्रत आणि छायाप्रत दोन्ही सोबत ठेवा. पडताळणीच्या वेळी मूळ प्रत आवश्यक असू शकते. यानंतर पार्सल करण्यापूर्वी तुमच्या बाइकची टाकी तपासली जाईल.


बाईक वाहतुकीबद्दल या गोष्टी माहित असणे आवश्यक 


- ज्या दिवशी तुम्हाला बाईक पाठवायची आहे त्या दिवशी किमान एक दिवस आधी बुकिंग करा.
- दुचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याची कागदपत्रे एकत्र असावीत.
- तुमचे ओळखपत्र - जसे की आधार, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी तुमच्यासोबत नेले जातील.
बाइक चांगली पॅक केलेली असावी, विशेषतः हेडलाइट.
बाईकमध्ये पेट्रोल नसावे. गाडीत पेट्रोल असेल तर 1000 रुपये दंड भरावा लागेल.


भाडे किती लागेल?


रेल्वेने माल पाठवताना वजन आणि अंतरानुसार भाडे मोजले जाते. रेल्वे हे दुचाकी वाहतुकीचे सर्वात स्वस्त आणि जलद साधन आहे. पार्सलच्या तुलनेत सामानाचे शुल्क जास्त आहे. 500 किमी अंतरापर्यंत बाइक पाठवण्याचे सरासरी भाडे 1200 रुपये आहे, जरी ते थोडेसे बदलू शकते. याशिवाय बाइकच्या पॅकिंगसाठी जवळपास 300-500 रुपये खर्च होऊ शकतात.


कोणीही बाईक बुक करू शकतो


वाहनाची नोंदणी तुमच्या नावावर नसली तरीही तुम्ही तुमच्या ओळखपत्राने वाहन बुक करु शकता, परंतु वाहनाची आरसी आणि विमा कागदपत्रे आवश्यक आहेत. बाईक नीट पॅक केलेली असावी जेणेकरुन त्यात कोणतेही नुकसान होणार नाही. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार्सल बुकिंग केले जाते. सामानाचे बुकिंग केव्हाही करता येते.