दक्षिण अमेरिका: युरोपियन लाँच सर्व्हिस प्रोव्हाईडर एरियन स्पेस रॉ़केट, फ्रेंच गयाना येथून भारताच्या संदेशवाहक GSAT-31 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा २ वाजून ३१ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेंच गयानातून उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याची भारताची ही पहिली वेळ नाही. याआधीही भारताकडून अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित करण्यात आले होते. दूरसंचार उपग्रह GSAT-31च्या उड्डाणाविषयी एरियन स्पेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या रॉकेटसह भारताच्या जीसॅट-३१ सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह १/ हेलास उपग्रह ४ यांचंही प्रक्षेपण करण्यात आलं आहे. 



भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचं वजन २५३५ किलोग्रॅम आहे. जीसॅट-३१ ४० वा दूरसंचार उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवण्याची अपेक्षा असणाऱ्या या उपग्रहाचा कार्यकाळ हा जवळपास १५ वर्षे आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पुन्हा एकदा इस्त्रोचं कौतुक करण्यात आलं असून, त्यांच्या यशस्वी कामगिरीची सर्व स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.