मुंबई : अर्थसंकल्प २०१८-१९ जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली शेअर बाजारातली पडझड अजुनही सुरूच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी शेअर बाजार ३३० अंकांनी चढून बंद झाला, परंतु, शुक्रवारी सकाळी पुन्हा बाजार ५०१ अंकांच्या पडझडीसहीत खुला झाला. त्यानंतर परदेशी शेअर बाजारातील पडझडीचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसला.


सकाळी १०.४० च्या सुमारास सेन्सेक्स ४७६ अंकांच्या पडझडीसहीत ३३,९३७ च्या स्तरावर पोहचला. बिझनेस सेशन दरम्यान सेन्सेक्स ५५० अंकांहून अधिक खाली पोहचला. 


बाजारात झालेल्या या पडझडीमुळे व्यावसायात गुंतवणूकदारांना २ लाख करोड रुपयांहून अधिक नुकसान झालंय. सुरुवातीच्या सत्रात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे २ लाख करोड रुपयांहून अधिक पैसे बुडाले. 


गुरुवारी सायंकाळच्या सत्रात शेवटी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप १,४७,९९,०९६.८८ करोड रुपये होता. परंतु, जेव्हा सेन्सेक्समध्ये ५५० अंकांची घट नोंदवण्यात आली तेव्हा गुंतवणूकदारांना २,११,२२९.८८ करोड रुपये बुडाले.