मुंबई : आजकाल फोन सुरू करण्यापासून ते बहुतांश वेबसाइट चालवण्यापर्यंत पासवर्ड सगळीकडे वापरला जातो. त्यात सगळ्यांनाच एक मजबूत म्हणजेच स्ट्राँग पासवर्ड ठेवायला वेबसाईटकडून सांगितले जाते. जेणेकरुन दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुमची पर्सनल आणि प्रायवेट गोष्ट उघडता किंवा वापरता येणार नाही. परंतु बऱ्याचदा होते असे की लोकं जास्त विचार न करता त्यावेळेला जो सुचेस तो पासवर्ड वापरतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की भारतातील सर्वाधिक लोकं पासवर्ड ठेवण्यासाठी कोणत्या लॉजिकचा वापर करतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही रिपोर्टच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात काही माहिती सांगणार आहोत.


लोकं सर्वात जास्त कोणता पासवर्ड वापरता? - NordPass च्या रिपोर्टनुसार, भारतातील सर्वात लोकप्रिय पासवर्ड 'Password' आहे. म्हणजेच भारतात मोठ्या संख्येने लोक पासवर्डच्या जागी Password असाच शब्द लिहतात.


जपानमधील लोकं देखील अशाच Password या शब्दाचा वापर करुन पासवर्ड ठेवतात. असं करणार जपान हा भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे.


याशिवाय भारतातील लोक कोणाच्या तरी नावाचे पासवर्ड बनवतात. त्यांच्या स्वत:च्या किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीच्या नावाने पासवर्ड ठेवतात.


भारतातील लोकप्रिय पासवर्ड -  जर भारतातील लोकप्रिय पासवर्डबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये iloveyou, कृष्णा, साईराम आणि ओमसाईराम सारख्या पासवर्डचा समावेश आहे.


पण, विशेष गोष्ट अशी आहे की 12345 आणि QWERTY हा पासर्वड भारतासह इतर देशांमध्ये देखील वापरला जातो, हा पासवर्ड भारतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत.