Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांना आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळू द्यायचं नाही असा गंभीर आरोप विनेश फोगाटने (Vinesh Phogat) केला आहे.  आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.  सामन्यादरम्यान आपल्या पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी भिती वनिताला सतावतेय. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक खेळवलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनिशची विजयी कामगिरी
29 वर्षीय विनेश फोगाटने 2019 आणि 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किली वजनी गटात कांस्य आणि एशियन गेम्स 2018 मध्ये 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं. पुढच्या आठवड्यात किरगिस्तानमध्ये होणाऱ्या एशियन क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवण्याासाठी विनेश सज्ज झाली आहे. 


पटियालामध्ये नुकत्याच झालेल्या चाचणी सामन्यात विनेशने 50 आणि 53 किलो वजनी गटात भाग घेतला होता. 53 किलो वजनी गटात तिल्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तर 50 किलो वजनी गटात तीने जेतेपद पटकावलं. या जोरावर तिला एशियन ऑलिम्पिक क्वालिफायनलमध्ये प्रवेश केला. 


विनेशचे संजय सिंह यांच्यावर आरोप
विनेशने एक्स हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. यात तीने म्टलंय. बृजभूषणद्वारे समितीवर बसवलेल्या डमी संजय सिंह आपल्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. महिला कुस्ती संघाबरोबर जे प्रशिक्षक आहेत ते सर्व बृजभूषणचे आहेत. त्यामुळे ही लोकं सामन्यादरम्यान माझ्या पाण्यात काहीतरी मिसळण्याचा कटही रचू शकतात'


19th एप्रिलपासून एशियन ऑलिम्पिक क्वालीफाय टूर्नामेंट सुरु होणार आहे. पण गेल्या एक महिन्यापासून आपण भारत सरकारकडे  (SAI,TOPS) प्रशिक्षक आणि फिजिओसाठी विनंती करत आहे. पण अद्याप याकडे दुर्लक्षच झालं आहे. मला डोपिंग प्रकरणात अडकवलं जाऊ शकतं, मानसिक त्रास देण्याची एकही संधी सोडली जात नाही. ऑलिम्पिक सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेआधी मानसिक उत्पीडन' केलं जात असल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.


विनेशने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय 'स्वत:च्या देशासाठी खेळण्याआधी आम्हाला आता राजकारणाला सामोरं जावं लागणार आहे का? देशात सुरु असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं चुकीचे आहे का? असे सवाल विनेश फोगाटने उपस्थित केला आहे. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना न्याय मिळणार का? अशी मागणी तीने केलीय.


भारतीय महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या तीन खेळाडूंपैकी विनेश ही एक कुस्तीपटू आहे.