Foreign trip by road, नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीचा मूड रिफ्रेश करणारी बेस्ट थेरपी म्हणजे व्हेकेशन(vacation) अर्थात कुठेतरी लांब फिरुन येणे. फिरायला आवडत नाही असं सांगणारं क्वचितच कुणीतरी सापडेल. व्हेकेशन प्लान करताना सर्वप्रथम बजेट आणि ट्रान्सपोर्टेशनचे प्लानिंग केले जाते. परदेशात फिरायला जायचे म्हंटले की विमानाशिवाय पर्याय नाही. मात्र, असे काही देश आहेत जिथे भारतीय विमानाने नाही तर आपली स्वत:ची कार घेवून फिरायला जाऊ शकतात(road trip). अलिकडच्या काळात वेकेशनचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. आपल्या सोईप्रमाणे टूर प्लान केली जाते. फॉरेन टूरबाबत सर्वांनाच विशेष आकर्षण असते. मात्र, यासाठी विमानाचे तिकीट आधीपासूनच बुक करुन ठेवावे लागते. मात्र, असे काही देश आहेत जिथे कार घेवून जाता येवू शकते. ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.  


नेपाळ (Nepal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे. अगदी सहज आपण बाय रोड नेपाळला जाऊ शकतो. नेपाळला जाण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह  नेपाळमध्ये प्रवास करता येवू शकतो. याशिवाय नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची देखील गरज नाही. दिल्लीहून काठमांडूला गेल्यास सोनौली सीमेवरून नेपाळमध्ये जाता येते. दिल्ली ते नेपाळ बाय रोड अंतर 1079 किमी इतके आहे. नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरसह अनेक ठिकाणं पर्टकांचे प्रमुख आकर्षण आहेत. 


थायलंड (Thailand)


थायलंडला जायचा प्लान असेल तर विमानाने जाण्याऐवजी कारने जा. बाय रोड प्रवास करताना थायलंडमधील संस्कृती अगदी जवळून पाहता येईल. थायलंड मध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे, चर्च आणि मंदिरे आहेत. बाय रोड ट्रीप करताना या सगळ्यांचा तुम्हाला एक वेगळा अनुभव घेता येईल. थायलंडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिसा आणि विशेष परमिटची आवश्यकता असते. काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर ते तुम्हाला सहज मिळेल. दिल्ली ते थायलंड हे अंतर रस्त्याने 4,138 किमी इतके आहे. बाय रोड हा  75 तासांचा प्रवास आहे. 


भूतान(Bhutan)


नेपाळप्रमाणेच भूतानमध्ये ट्रीप प्लान करने भारतीयांसाठी अगदी सोपे आहे.  भूतानला रोड ट्रिपने जाणाऱ्या भारतीयांना कोणतीही अडचण येणार नाही. कारण येथे जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही. मात्र, भूतानच्या सीमेवर जाण्यापूर्वी वाहनाचा नंबर नोंदवा लागतो. दिल्ली ते भूतान अंतर 1,915 किमी इतके आहे. येथे पोहोचण्यासाठी 37 तास लागतील. 


मलेशिया(Malaysia)


मलेशिया हा देखील रोड ट्रीपसाठी बेस्ट ऑप्शन आहे.  दिल्लीहून क्वालालंपूरला जाण्यासाठी म्यानमार आणि थायलंड या दोन देशांमधून जावे लागते. या प्रवासा दरम्यान पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हिसा सोबत असल्यास कोणतीही अडचण येणार नाही. दिल्ली ते मलेशिया हे अंतर बायरोड 5,536.6 किमी इतके आहे. हा प्रवास 95 तासांचा आहे.


 श्रीलंका(Sri Lanka)


श्रीलंकेला देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातूव प्रवास करुन तुम्ही श्रीलंकेत पोहची शकता. तामिळनाडूमध्ये पोहोचल्यानंतर, तुतिकोरिन बंदरापासून श्रीलंकेतील कोलंबो बंदरापर्यंत फेरी बोटे जाता येते. दिल्ली ते श्रीलंका हे अंतर 3,571 किमी आहे. 84 तासांत श्रीलंकेत पोहचता येईल.


तुर्की आणि बांग्लादेश ( Turkey and Bangladesh)


दिल्ली ते तुर्कीचा रोड मॅप नवी दिल्ली- ल्हासा (तिबेट)- चीन- किर्गिस्तान- उझबेकिस्तान- तुर्कमेनिस्तान- इराण- तुर्की असा आहे. तर, ढाका-चितगाव हायवेने तुम्ही सहज बांगलादेशात जाऊ शकता.  दिल्ली ते बांगलादेश हे रस्त्याने अंतर 1,799 किमी इतके असून  येथे  पोहोचण्यासाठी 32 तास लागतात. या देन्ही देशांमध्ये तुम्हाला भारतीयांना तात्काळ व्हिसा दिला जातो.