मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेकचा थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार २३९ नव्या रुणांची नोंद झाली असून ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ५६ हजार ७०६ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.



अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ७ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरू असून २२ लाख ८० हजार ५६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  


कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या २४ तासांत १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आत्तापर्यंत ३.४४ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.