नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या देशात ४१ लाख १३ हजार ८१२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ७० हजार ६२६ रुग्णांचा कोरोना व्हायरसने बाळी घेतला आहे. तर गेल्या २४ तासांत १ हजार ६५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐकीकडे भरतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तर दुसराकडे दिलासा देणारी बाब म्हणजे. ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ८ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू असून ३१ लाख ८० हजार ८६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  


देशात दररोज ८० हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. कोरोनाच्या वेगाने वाढत्या रुग्णांमुळे भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलला मागे टाकत भारत आता अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे.