देशात कोरोना रुग्णांची संख्या ६१ लाखांवर, गेल्या २४ तासांत ७७६ जणांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या ६१ लाखांवर पोहोचली असून देशात ६१ लाख ४५ हजार २९२ जण कोरोना बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
सध्या देशात ९ लाख ४७ हजार ५७६ रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचप्रमाणे ५१ लाख १ हजार ३९८ रुग्णांनी या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. देशातील रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अधिक आहेत.
नव्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,५१,१५३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३५१ मृत्यू आहेत. तर, १०,४९,९४७ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे.