Padma Bhushan Award to Alphabet CEO Sundar Pichai: अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला नेहमीच भारताशी जोडलेलो आहोत असंच वाटतं तसेच ते जिथे जातात तिथे आपली भारतीय ओळख त्यांच्यासोबत ते घेऊन जातात असं ते म्हणतात. हा मानांकित पुरस्कार स्विकारतानाही त्यांनी यावेळी आपल्या याच भावना व्यक्त केल्या. सुंदर पिचाई हे गुगल या बलाढ्य कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत आहे. त्याचसोबत अल्फाबेट या कंपनीचाही ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम पाहतात. त्यांचा मदूराई ते माऊंनटन व्ह्यू असा प्रवास सगळ्यांचा प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील उतुंग कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.(indias envoy to us presents google and alphabet ceo sundar pichai with india's highest civil award padma bhushan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुंदर पिचाई म्हणाले, "मी भारत देशाचाच एक भाग आहे आणि मी जिथे जातो तिथे भारतीय संस्कृती घेऊन जातो." पिचाई यांना वर्ष 2022 साठी व्यवसाय आणि उद्योग श्रेणीमध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पिचाई यांना शुक्रवारी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांच्या कुटुंबातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीत भारतातील तिसरा सर्वात मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 



अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारताना पिचाई म्हणाले, या पुरस्कारासाठी मी भारत सरकार आणि भारतातील जनतेचा ऋणी आहे. तंत्रज्ञानाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गुगल (Google) आणि भारत यांच्यातील भागीदारी सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे.", अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.