Corona Vaccine : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात कमी झालेल्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने भीती वाढवली आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असतानाच ओमायक्रॉन रुग्णांमध्येही वाढ होऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 


तीन नव्या औषधांना मान्यता
देशात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी आणखी दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. कोर्बेव्हॅक्स (CORBEVAX) आणि कोवोव्हॅक्स (COVOVAX) या दोन लसींना मंजुरी देण्यात आलीय. तर कोविडवर उपचार करण्यासाठी मोलनुपिरावीर (Molnupiravir) गोळीला मान्यता देण्यात आलीय. यापैकी मोलनुपिरावीर गोळी ही अठरा वर्षांवरील रूग्ण तसंच सहव्याधी असलेल्यांना देण्यात येईल. 


देशात आता 8 लसी उपलब्ध
या परवानग्यांमुळे आता देशात कोविड विरोधी आता 8 लसी उपलब्ध झाल्या आहेत. याआधी  कोविशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी (zycov-d), रशियाची स्पुटनिक व्ही (sputnik v), मॉडर्ना (moderna vaccine) आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मान्यता मिळालीय. कोर्बेव्हॅक्स ही लस हैदराबादच्या बायोलॉजीकल ई या कंपनीने तयार केलीय. तर कोवोव्हॅक्स ही लस पुण्याच्या सिरमने तयार केलीय. यामुळे 8 लसींपैकी तीन लसी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आहेत. 


केंद्रीय मंत्र्यांनी केलं ट्विट


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी आज ट्विट याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, सर्व नागरिकांचं अभिनंदन, कोरोनाविरुध्दच्या लढाईत आणखी एक भक्कम पाऊल. कॉर्बेव्हॅक्स आणइ कोवोव्हॅक्स लसींससह अँटी व्हायरल औषध मोलनुपिरावीरलाही मान्यात दिली आहे. या औषधांना आपात्कालीन वापरासाटी मान्यता देण्यात आली आहे.



मनसुख मांडविया यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, कोर्बेव्हॅक्स ही लस हैदराबादमधल्या बायोलॉजिकल ईने बनवलेली भारतातील स्वदेशी विकसित प्रोटीन सब युनिट लस आहे. आता तिसरी लस भारतात विकसित झाली आहे. तर कोवोव्हॅक्सची निर्मिती पुण्यातीर सीरम इन्स्टिट्यूटने केली आहे.