मुंबई : कोरोनाचा (Corona Virus) धोका कमी झालाय असं वाटत असतानाच देशावर आता एक नवं संकट उभं राहिलंय.  देशात मंकीपॉक्सचा (Monkey Pox) पहिला रूग्ण आढळून आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढलीय. (indias first monkeypox case reported from kerala)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची चौथी लाटही ओसरतीय असं वाटत असतानाच भारतात आता मंकीपॉक्सनं शिरकाव केलाय. केरळमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रूग्णाची नोंद झालीय. 


संक्रमित व्यक्ती तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात आली होती. तसच ही व्यक्ती 11 जणांच्या संपर्कात आली असल्याची माहितीही पुढे आलीय. आता या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. 


मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणं स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग 1958  मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणा-या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचं नाव मंकीपॉक्स असं पडलं. 


हा विषाणू माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्यानं पसरतो. पुरळ येणे, ताप येणं ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारणत: 2 ते 4 आठवडे हा आजार राहू शकतो.


मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यातलं संकट रोखायचं असेल तर कोरोनाप्रमाणे प्रत्येकानं आपली आणि कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे.