India's Most Generous Person: भारतात अनेक बडे उद्योगपती आहेत आणि दानशूर उद्योगपतींची संख्याही कमी नाही.  आयुष्यभर कमावलेल्या कमाईतील मोठा वाटा परोपकार अर्थात दान म्हणून खर्च करतात. कोरोना काळात अनेकांनी जागतिक आरोग्य संघटनांपासून ते विविध देशातील सरकारांना मोठ्या प्रमाणात मदत केली. पण सर्वाधिक दान करणारा भारतीय उद्योगपती कोण असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा आपल्या या उद्योगपतीचं नाव सर्वात अग्रणी असतं.  टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना शतकातील सर्वात मोठे दानशूर मानलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानशूर उद्योगपतींची यादी
आता अशाच दानशूर उद्योगपतींची यादी एडलगिव हुरुन इंडिया फिलैथ्रॉपीने (EdelGive Hurun India Philanthropy List 2022) यांनी जाहीर केली आहे. या यादीत अव्वल स्थानी भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी नव्हे तर एक असे उद्योगपती आहेत जे दिवसाला तब्बल 3 कोटींची दान करतात. 


भारतातील सर्वात मोठे दानशूर


या यादीत सर्वात अव्वल स्थानी आहेत HCL Technologies चे संस्थापक शिव नाडर. उद्योगपती शिव नाडर (Shiv Nadar) यांनी वर्षभरात 1 हजार 161 कोटी रुपये दान केले आहेत. भारतातीतल सर्वात मोठे दानशूर ( India's Most Generous) म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. \



माहितीनुसार शिव नाडर यांनी दिवसाला जवळपास 3 कोटी रुपयांचं दान केलं आहे. या यादीत Wipro चे अझीम प्रेमजी (Azim Premji) दुसऱ्या स्थानावर आहेत. 77 वर्षांचे अझीम प्रेमजी वर्षाकाठी 484 कोटी रुपयांचं दान केलं आहे. 


अंबानी तिसऱ्या, अदानी सातव्या स्थानावर 
या यादीत Reliance Industries चे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तिसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांनी वर्षाला 411 कोटी रुपयांचं दान केलं आहे. तर Aditya Birla Group चे कुमार मंगलम बिर्ला यांनी 242 कोटींचं दान केलं असून ते चौथ्या स्थानावर आहेत. 


Mindtree समुहाचे सुष्मिता आणि सुब्रतो बागची (Susmita and Subroto Bagchi) यांनी 213 कोटींचं दान करत यादीत पाचवा क्रमांक गाठला आहे. देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले Adani Group चे गौतम अदानी हे या यादीत सातव्या स्थानावर आहेत. त्यांनी वार्षिक 190 कोटी रुपयांचं दान केलं आहे. Zerodha चे फाऊंडर निखिल कामत हे सर्वात युवा दानशूर म्हणून समोर आले आहेत. त्यांनी 100 कोटी रुपयांचं दान केलं आहे.