मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशातील कच्च्या तेलाचे उत्पादन घटले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर डिसेंबर 2021 मध्ये भारतात कच्च्या तेलाच्या उत्पादनातही घट नोंदवली गेली आहे. सरकारी मालकीच्या ओएनजीसीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाव वाढण्याची भीती का?


मागणीच्या तुलनेत देशांतर्गत पुरवठा कमी असल्यामुळे भारताला कच्च्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे भागवावी लागते. सध्याची परिस्थिती अशी आहे की जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे देशांतर्गत उत्पादनात घट होत आहे. अशा स्थितीत येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ONGC च्या उत्पादनात घट


भारतातील सर्वात मोठी तेल उत्पादक ओएनजीसीने डिसेंबरमध्ये 16.5 लाख टन कच्च्या तेलाचे उत्पादन केले.जे तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडचे ​​उत्पादन 5.4 टक्क्यांनी वाढून 2,54,360 टन झाले आहे.


सध्या इंधन दर स्थिर


देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या अडीच महिन्यांपासून स्थिर आहेत. नवीन दरानुसार, मुंबईत पेट्रोल सर्वात महाग आहे 109.98 रुपये तर दिल्लीत सर्वात स्वस्त पेट्रोल 95.41 रुपये आहे.