भारताच्या `ऑपरेशन जेरेनिमो`बद्दल भारतीयांत उत्सुकता...
भारताचे गुन्हेगार आता कोणत्या बिळात लपणार?
नवी दिल्ली : पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचं आता काही खरं नाही. जसं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमधून शोधून मारलं होतं. तशी कारवाई भारत करण्याची शक्यता आहे. भारतानं तसे स्पष्ट संकेतही दिलेत. अझर मसूद, हाफिज सईद यांच्यासारखे दहशतवादी भारताच्या एकतेचे आणि अखंडतेचे मारेकरी आहेत. अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, अझर मसूद आणि झकी-उल- रहेमान लखवी यांनी वारंवार भारताच्या एकात्मतेला आव्हान दिलं. हे सगळे दहशतवादी भारताविरोधी कारवाया करून पाकिस्तानच्या बिळात लपून बसलेत. या सगळ्या दहशतवाद्यांची आता खैर नाही. लादेनला मारण्यासाठी जसं अमेरिकेनं 'ऑपरेशन जेरिनिमो' राबवलं तसा भारतही पाकिस्तानात घुसू शकतो. दाऊद कराचीत राहतो. त्याला त्याच्या घरात घुसून भारतात फरफटत आणण्याचा आत्मविश्वास भारतात निर्माण झालाय. जेटलींचं वक्तव्य म्हणजे पाकिस्तानला सूचक इशाराच आहे.
अमेरिकेचं 'ऑपरेशन जेरिनिमो'
आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये लपून बसला होता. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएनं ही माहिती मिळवली. लादेनचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला 'ऑपरेशन जेरिनिमो' नाव देण्यात आलं. १ मे २०११ची मध्यरात्र या कारवाईसाठी निवडली गेली. २४ अमेरिकन नेव्ही सील कमांडोंची टीम हेलिकॉप्टरने अबोटाबादमध्ये उतरली. या टीमनं लादेनला त्याच्या घरात घुसून कंठस्नान घातलं. ही कारवाई अवघ्या ३० मिनिटांत ही कारवाई उरकण्यात आली.
दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश ही पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक होत चाललीय. मंगळवारी भारतीय हवाईदलाच्या कारवाई झाल्यानंतर कोणत्याही देशानं भारतीय कारवाईचा निषेध केला नाही. पाकिस्ताननं अफगाणिस्तानातल्या जेहादींच्या, तालिबान्यांच्या रूपानं पाळलेला हा दहशतवादाचा राक्षस पाकिस्तानसाठीच मारक ठरलाय.
काय होतं ऑपरेशन जेरिनिमो?
- लादेन पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लपला होता
- सीआयएनं लादेनची माहिती मिळवली
- लादेनचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन जेरिनिमो
- १ मे २०११ची मध्यरात्र या कारवाईसाठी निवडली
- २४ अमेरिकन नेव्ही सील कमांडो हेलिकॉप्टरने अबोटाबादमध्ये उतरले
- सील कमांडोंनी लादेनला त्याच्या घरात घुसून कंठस्नान घातलं
- ही कारवाई अवघ्या ३० मिनिटांत उरकली