मुंबई : भारतातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत एकूण ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र समोर उभं राहत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील २४ तासात ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी आता कम्युनिटीमध्ये घुसली आहे. देशभरात कोरोना वायरसचे ९१५२ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८५६ जणांना बरं करून सोडण्यात आलं आहे.



जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.




केंद्र सरकारचे सर्व मंत्री आजपासून मंत्रालयात आपापले कामकाज संभाळतील. काम करताना सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रविवार संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून १ हजार ९८२ झाली. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार झाली. यातील ९७१ जण तबलीगी जमातीच्या संपर्कात येऊन संक्रमित झाले.