मोरबी (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मोराबी येथील रॅलीत कॉंग्रेसवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. या वेळी त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या मोराबी दौऱ्याची आठवण काढत कॉंग्रेसवर टीका केली. इंदिरा गांधी जेव्हा मोराबीत आल्या होत्या तेव्हा नाकावर रूमाल ठेऊन आल्या होत्या, असे मोदी म्हणाले. आपले म्हणने पटवून देताना त्यांनी एका मासिकात छापून आलेल्या छायाचित्राचा हवाला देत स्वत:च्या नाकावरही हात ठेवला.


मोरबीच्या रस्त्यावरून भाजपला येतो सुगंध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींवर निशाणा साधताना म्हटले की, चित्रलेखा मासिकात छापलेले मी एक छायाचित्र पाहिले. हे छायाचित्र इंदिरा गांधी मोरबीच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हाचे आहे. इंदिरा गांधी येथे आल्या तेव्हा त्यांना इथल्या परिसराची दूर्गंधी आली. मात्र, जनसंघ, आरएसएस आणि भाजपच्या लोकांना मोरबीच्या रसत्यांतून सुगंध येतो. हा सुंगंध मानवतेचा आहे.


मोराबीशी माझे घनीष्ट नाते


पुढे बोलताना मोदी म्हाणाले, 'माझे मोराबीशी खूप घनीष्ट नाते आहे आहे. सुख-दुख:च्या कोणत्याही प्रसंगी मी येथे येतो. माझ्यासाठी माझ्या लोकांचे सूख हा मुद्दा महत्त्वाचा असतो. जेव्हा आम्ही सत्तेत नसतो तेव्हाही आम्ही मोरबीच्या लोकांसोबत असतो. समाजाची सेवा करतो. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी जनसंघ, आरएसएस आणि भाजपचे लोक मोरबीच्या लोकांच्या सोबत असतात.'



कॉंग्रेससाठी विकास म्हणजे हॅण्डपंप, भाजपसाठी पाईपलाईन


मोदी म्हणाले, 'सत्तेवर आल्यावर आम्ही पाहिले की, सौराष्ट्र आणि कच्छच्या लोकांची मुख्य समस्या ही पाणी आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्यामुळे लोकांच्या जीवमानावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होतो. हे चित्र भाजपने बदलले आणि नर्मदेचे पाणी इथपर्यंत पोहोचवले. संकटलाही आम्ही संधीत बदलतो. कॉंग्रेससाठी विकास म्हणजे हॅडपंप आहे. तर, भाजपसाठी पाईपलाईन. पाईपलाईनच्या माध्यमातून नर्मदेचे पाणी इथपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी झालो.'