व्यावसायिकाचं महिलेसोबत जुळलं सूत, हनिमूनला गेले युरोपला पण आल्यावर झाला घात
व्यावसायिक आणि एका महिलेचं प्रेम जमतं, दोघेही हनिमुनसाठी युरोपला जातात पण...
Crime News : एका व्यावसायिकाचं घटस्फोट घेतलेल्या महिलेसोबत सूत जुळलं, दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघेही हनिमूनसाठी गेले मात्र तिकडून परतल्यावर महिला 50 लाखांचे दागिने घेऊन गायब झाली. व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.
नेमकं काय घडलं?
व्यावसायिकाची महिलेसोबत Shadi.com या वेबसाईटवर ओळख झाली, दोघेही घटस्फोटित होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर तीन महिन्यांनी दोघे हनिमूनसाठी युरोपला गेले. हनिमून झाल्यावर दोघेही भारतात आले. भारतात परतल्यावर काही दिवसांमध्येच दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला.
वाद झाल्यावर महिलेने घर सोडलं आणि फरार झाली. व्यावसायिकाने तिला संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र ती त्याचा फोन घेत नाही, त्यानंतर व्यावसायिकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि याबाबत तक्रार नोंदवली. यामध्ये, पत्नी घरातून 50 लाखांचे वडिलोपोर्जित दागिने घेऊन फरार झाल्याचं सांगितलं.
दरम्यान, इंदूरच्या लसुडिया पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास गणेश सोलंकी करत आहेत. व्यावसायिकाने तक्रार करत महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.