इंदौर : मध्यप्रदेशची आर्थिक राजधानी इंदौरच्या जवळ असलेल्या महूमध्ये मंगळवारी एक मोठी घटना घडली. संध्याकाळी बिल्डींगची लिफ्ट पडून पाथ इंडिया कंपनीचे मालक पुनीत अग्रवाल यांच्यासह कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुनीत अग्रवाल यांची पत्नी नीति अग्रवाल गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर इंदौरच्या चोइथराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिझनेसमन पुनीत अग्रवाल मुलगी पलक, जावई पलकेश, नातू नभ आणि नातेवाईक गौरव आणि आर्यवीर यांच्यासोबत महू येथील पातालपानीत असलेल्या फार्म हाऊसमध्ये नव वर्षाच्या पार्टीकरता गेले होते. या दरम्यान संध्याकाळी अग्रवाल कुटुंबीय कॅप्सूल लिफ्टमधून फार्म हाऊसमध्ये जात होते. या दरम्यान 70 फूट उंच बिल्डींगमध्ये जाण्याकरता लिफ्टचा वापर केला गेला. 



लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट तुटून खाली कोसळली. अचानक झालेल्या या भयावह अपघातात लिफ्टमध्ये असलेल्या लोकांचा मृत्यू झाला. 



विख्यात कंस्ट्रक्शन कंपनी पाथ इंडियाचे दिग्दर्शक पुनीत अग्रवाल यांनी पातालपानीत निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फार्म हाऊसची उंच बिल्डींग बनवली आहे. एकांतात बनलेल्या या इमारतीमध्ये अग्रवाल कुटुंबीय अनेकदा सेलिब्रेशन करताना दिसायचे. 


पार्थ इंडिया देशभरात पूल निर्माण, राजमार्ग निर्माण, टोलमार्गाचे संचलनची कामे करतात. 1996 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत जवळपास पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत.