महागाईचा डंका : बापरे...पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार
Petrol, diesel price hike : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे.
मुंबई : Petrol, diesel price hike : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे. औरंगाबादमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रुपये एवढा आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर लागतो. त्यामुळे ही दरवाढ इतर शहरांपेक्षा अधिक आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झालंय. 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रू. महागलंय. या दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे.
सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडले आहे. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले आहे. तर 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे. आधीच महागाईत वाढ होत असताना त्यात अधिक भर पडणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस वगळता दररोज दरांत वाढ होतेय. आजच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील दर पाहा
औरंगाबाद :
पेट्रोल -( Petrol) - 115.83
डिझेल - (Diesel) - 100.13
अमरावती :
पेट्रोल -( Petrol) -115.68
डिझेल - (Diesel) -100.01
परभणी :
पेट्रोल - ( Petrol) - 117.24
डिझेल - (Diesel) - 99.97
नाशिक :
पेट्रोल -( Petrol) -114.60
डिझेल - (Diesel) - 97.43
पुणे :
पेट्रोल - ( Petrol) -113.69
पेट्रोल - Power Rs -118.19
डिझेल - (Diesel) - 96.56
कोल्हापूर :
पेट्रोल - ( Petrol) - 114.27
पेट्रोल - Speed - 117.08
डिझेल - (Diesel) - 97.14
रायगड :
पेट्रोल - ( Petrol) - 114.29
डिझेल - (Diesel) - 97.11