मुंबई : Inflation : महागाईचा भडका उडत असताना आणखी इंधन गॅस दरवाढीने आता यात भर पडत आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसही महागला आहे. पीएनजी दीड रुपयांनी तर सीएनजी दोन रुपयांनी महागला आहे. या दरवाढीचा फटका मुंबईकरांना बसला आहे. (Inflation : CNG and PNG prices rise again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाईत अधिक भर पडत आहे. आता सीएनजी गॅस दोन रूपयांनी तर घरगुती पाइपलाईन गॅस दीड रुपयांनी महाग झाला आहे. 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ केली आहे.



महानगर गॅस लिमिटेडने 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ केली आहे. सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपये तर, घरगुती पाईपलाईन गॅसचे दर दीड रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. मुंबईत ही दरवाढ केली गेली असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. दरवाढीनंतर सीएनजीचे नवे दर 63.50 रुपये किलो आणि घरगुती पाइपलाइन गॅसचे दर 38 रुपये होणार आहेत.