Narayan Murthy Success Story Infosys: देशातील सर्वात लोकप्रिय आणि मानांकित उद्योगपतींमध्ये इन्फोसिसच्या नारायण मूर्ती (Infosys) यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. त्यांच्या तरूणपणी त्यांनी एक स्वप्न पाहिले ते म्हणजे इन्फोसिसचं स्वप्न पुर्ण करण्याचे. आज इन्फोसिसचे साम्राज्य जगभरात पोहचले आहे आणि गेल्या 40 वर्षात या कंपनीनं जगभरातील लाखो लोकांपर्यंत (Indian IT Company) आपली सेवी पुरवली आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रात नाविन्य आणि तंत्रज्ञानाची अनोखी (IT Innovation) ओळख जगाला करून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा 1981 साली सात मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरू केली होती. आज इन्फोसिसचं नावं हे प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडावर आहे. भारतातील मोठी आयटी कंपनी म्हणून या कंपनीनं नावलौकिक मिळवलं आहे. (infosys success story know how narayan murthy got loan from his wife and built infosys company along with 7 friends)


सात मित्र, खिशात 10 हजार रूपये... 


पाटणी कंम्प्युटर सिस्टममध्ये काम करणाऱ्या सात मित्रांनी इन्फोसिसचे स्वप्न पाहिलं आणि अवघ्या 10 हजार रूपयांत त्यांनी या कंपनीची (7 Friends Who Started Infosys) सुरूवात केली.  एन. आर. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा असे त्या सात मित्रांची नावं होती.


आज ही कंपनी मोठ्या प्रमाणात टर्नओव्हर करते आहे आणि कंपनीचे बाजारातील भागभांडवल कंपनीचे 1.32 लाख कोटी रुपये आहे. 1993 मध्ये इन्फोसिस या कंपनीनं आपला आयपीओ आणला. सुरूवातीची या आयपीओची (Infosys IPO) किंमत ही 95 रूपये एवढी होती. ही कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंज आणि Nasdaq वर लिस्टेड झाली. 


बायकोकडून घेतले कर्ज


इन्फोसिसचा हा उद्योग 54 देशातील 247 शहरांमध्ये विस्तारलेला आहे. या कंपनीत सुमारे 3 लाख 45 हजार कर्मचारी काम करतात. जी देशातील दुसरी सगळ्यात मोठी आयटी कंपनी ठरली आहे. या कंपनीला अनेक मानांकन आणि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आज ही कंपनी 17 अब्ज डॉलरचा वार्षिक रेव्हेन्यू कमावते.


पण इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्यी पत्नीकडून सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांच्याकडून 10 हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांचे पती ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) हे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत. 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेली इन्फोसिस ही देशातील दुसरी कंपनी आहे.