मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इंफोसिस आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट करण्याची संधी देत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचे स्किल वाढवण्यासाठी आणि एट्रीशन रेट कमी करण्यासाठी हा उपाय शोधून काढला असून यामार्फत पगार दुप्पट होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन ब्रिज पोग्राम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इन्फोसिस दुप्पट पगार देणार आहे. यामार्फत कर्मचारी नोकरी न सोडता नवीन स्किलचा विकास करू शकतात. जे कर्मचारी आपली स्किल वाढवणार आहेत त्यांच्या पगारात 80 ते 120 टक्के वाढ होणार आहे. 


या प्रोग्राम अंतर्गत 400 लोकांना ट्रेन केलं जाणार आहे. या प्रोग्रामचा मुख्य हेतू असा की, कर्मचारी नोकरी सोडून जाणार आहे. यामुळे ज्युनिअर पोझिशनवर कमी एट्रीशन रेट असणार आहे. इन्फोसिसने 6 नवीन ब्रिज प्रोग्राम तयार केले आहेत. यामध्ये ब्रिज टू कंसलटिंग, ब्रिज टू पावर प्रोग्रामिंग, ब्रिड टू डिझाइन, ब्रिज टू टेक आर्किटेक्टर सारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. 


इन्फोसिसचे आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांवर 32,472 करोड रुपये खर्च केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2017 मध्ये 30,994  रुपयांचा खर्च करून 4.9 टक्के वाढ केली होती. कंपनीने उचलेल्या पाऊलामुळे खर्चात आणखी वाढ होऊ शकते.