नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आयएनएस कलवरीला देशाला समर्पित केलं. आयएनएस कलवरीच्या रूपाने १७ वर्षांनंतर देशाला नवीन सबमरीन मिळालं आहे. यामुळे समुद्रात भारताची ताकद वाढणार आहे. या पाणबुडीच्या माध्यमातून शत्रूंच्या कारवाया उधळल्या जाणार आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आयएनएस कलवरीच्या रूपाने साधारण दोन दशकांनंतर भारताला डिझल-इलेक्ट्रिक सबमरीन मिळालं आहे. यामुळे नौसेनेची शक्ती वाढली आहे. याआधी नौसेनेकडे केवळ १३ पारंपारिक सबमरीन आहेत. 
 
- खोल समुद्रात मिळणा-या खतरनाक टायगर शार्कच्या नावावर सबमरीनचं नाव INS कलवरी ठेवलं गेलंय. डिसेंबर १९६७ मध्ये भारताला पहिलं सबमरीन रशियाकडून मिळालं होतं. 


- ही स्कॉर्पिन श्रेणीच्या त्या ६ पाणबुड्यांपैकी एक पाणबुडी आहे, जी भारतीय नौसेनेमध्ये सामिल करणार आहे. 



फ्रान्सने केली मदत


- फ्रान्सच्या मदतीने सबमरीन प्रोजेक्ट-७५(२३,६५२ कोटी रूपये)च्या अंतर्गत बनवलं गेलं आहे. या सबमरीनचं वजन १५६५ टन आहे. 


- स्कॉर्पिन प्रोजेक्टला बराच उशिर झाला आणि त्याचा खर्चही वाढला आहे. फ्रेन्च शिपबिल्डर DCNS सोबत ऑक्टोबर २००५ मध्ये यासंदर्भात करार झाला होता. अधिका-यांचं म्हणनं आहे की, आयएनएस कलवरीला तयार होण्यास भलेही उशिर झाला असेल पण समुद्रातील प्रत्येक युद्धाची कला या सबमरीनमध्ये आहे. 


- आता दुसरी INS Khanderi २०१८ च्या मध्यात भारतीय नौसेनेमध्ये सामिल होणार आहे. तर तिसरी INS Karanj २०१९च्या सुरूवातीला मिळेल. 


आणखी सबमरीनची गरज


- पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या वाढत्या आव्हानांना बघता भारताला कमीत कमी १८ डिझल-इलेक्ट्रिक आणि ६ परमाणू न्यूक्लिअर अटॅक सबमरीनची गरज आहे. 


- सध्या भारताकडे १३ डिझल-इलेक्ट्रिक सबमरीन आहे. ज्या १७ ते ३२ वर्ष जुन्या आहेत. यातील केवळ ७ किंवा ८ सबमरीन एकाचवेळी ऑपरेशनल असतात. 


- भारताकडे १ परमाणू ऊर्जे संचलित बलिस्टीक मिसाईल सबमरीन INS अरिहंत आहे. जी ७५० किमीपर्यंत परमाणू मिसाईल सोडू शकते. 


चीन, पाक आणि अमेरिकेकडे काय?


- चीनक्डे ५६ सबमरीन आहे. यातील ५ JIN श्रेणीच्या परमाणू ऊर्जेवर संचलित सबमरीन आहेत. ज्या परमाणू बलिस्टीक मिसाईलने परिपूर्ण आहे. 


- तर पाकिस्ताकडे ५ डिझल-इलेक्ट्रीक सबमरीन आहेत. त्यांना चीनकडून आणखी ८ सबमरीन मिळणार आहेत. 


- अमेरिकेकडे ७२ न्यूक्लिअर सबमरीन आहेत. रशियाकडे ४० पेक्षा जास्त सबमरीन आहेत तर यूके आणि फ्रान्सकडे ८-१२ सबमरीन आहेत.