नवी दिल्ली : आयटी सोल्युशन प्रोवाइडर इंस्पिरा एंटरप्राइज इंडिया आपला IPO घेऊन येत आहे. आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी सोल्युशन प्रोवाइडर इंस्पिरा एंटरप्राइज इंडियाने आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपये उभारण्यासाठी मार्केट रेग्युलेटर SEBI कडे ड्राफ्ट दाखल केला आहे. 


SEBI मध्ये दाखल ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या अंतर्गत IPO मध्ये 300 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी केले जाणार आहे. 


आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून वर्किंग कॅपिटलची गरज तसेच कर्जाची रक्कम चुकवता येईल.


इंस्पिरा एंटरप्राइज सायबर सेक्युरिटीवर लक्ष देणारी एक प्रमुख डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सायबर सेक्युरिटी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा प्रदान करते.