Happy Birthday Ratan Tata: भारतीय उद्योग जगताचा विषय जेव्हाजेव्हा निघतो तेव्हा तेव्हा काही नावं ओघाओघानं समोर येतात. जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या अशाच उद्योजकांमध्ये अग्रगणी आणि प्रचंड सन्मानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे, रतन टाटा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अशी ओळख असणाऱ्या रतन टाटा यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. 'बस नाम ही काफी है...' हा डायलॉग इथं त्यांना पूरेपुर लागू होतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांनी एका कार्यक्रमामध्ये रतन टाटा यांचा सन्मान केल्यानंतर त्यांच्यापुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले होते. (Ratan Tata)


भारतीय व्यवसाय आणि उद्योगजगतासाठी तो क्षण इतिहासात नोंद करुन ठेवावा असाच होता. 


मूर्ती यांच्याकडून मिळालेला हा सन्मान भारावून टाकणारा होता, अशीच प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली होती. 


मुळात आपापल्या क्षेत्रातील दोन भीष्म पितामह समोरासमोर आल्यानंतर त्यांच्याकडून एकमेकांना मिळालेला हा मान अनेक पिढ्यांसाठी मोठा आदर्श प्रस्थापित करुन गेला होता. 


ज्यांच्यापुढे खुद्द नारायण मूर्तीसुद्धा नतमस्तक झाले अशा रतन टाटा यांनी टाटा उग्योग समूहाला आजच्या उंचीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 


रतन टाटा हे त्यांची व्यवसायातील दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि परोपकारी वृत्तीसाठी कायमच ओळखले जातात. 


रतन टाटा यांनी काही सिद्धांत कायमच पाळले ज्यांच्या बळावर त्यांनी इतकं यश संपादन केलं. 


आपण कायमच एखादा असा आदर्श शोधत असतो, ज्याच्या प्रेरणेमुळं आपणही यशाच्या वाटेवर सहजपणे वावरु शकू. रतन टाटा म्हणजे याच आदर्शाचं दुसरं नाव. 



रतन टाटा यांच्या आचरणात येणाऱ्या आणि आपल्यासाठी मोलाच्या फायद्याच्या ठरतील अशा शिकवणी... 
- मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी निर्णय घेतो आणि मग तो योग्य ठरवतो. 


- अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आयुष्यात पुन्हा जगू इच्छितो. पण, मी काय केलं नाही हे मी कधीच मागे वळून पाहणार नाही. 


- तुमच्यावर लोकं जे दगड फेकतात त्यांचा वापर स्मारक बांधण्यासाठी करा.


- जर तुम्हाला वेगानं पुढे जायचंय तर एकट्यानं पुढे चला. पण, दूरवर जाऊ इच्छिता तर मात्र सर्वांच्या सोबतीनं चला. 


- दुसऱ्यांची नक्कल करणारा फार थोड्या काळासाठी यशस्वी होतो. पण, आयुष्यात फार पुढे जात नाही. 


- लोखंडाला फक्त त्याचा गंजच नष्ट करु शकतो. असंच, कोणीही व्यक्तीला नष्ट करु शकत नाही. पण, त्याची मानसिकता मात्र त्याला नष्ट करु शकतो.


- जीवनात पुढे जाण्यासाठी कायमच चढ- उतार गरजेचे असतात. कारण, इसिजीमध्येही येणारी एक सरळ रेष आपण मृत असल्याचं सांगते.