Inspirational Story: गले लठ्ठ पगाराचा Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी; या महिला अधिकाऱ्याच्या हिमतीला सलाम!
कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या पगाराची चांगली नोकरी सोडून स्वत:चे स्टॉल सुरु करण्याचा निर्णय या तरुणीने घेतला आहे.
Inspirational Story of Sharmistha Ghosh: सरकारी नोकरी (Government Job) मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेक जण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात आणि नोकरी मिळवतात. तर, काहीजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नियमबाह्या मार्ग देखील अवलंबवतात. एकदा सरकारी नोकरी मिळाली की कुणी नोकरी सोडण्याचा विचारही करत नाहीत. मात्र, शर्मिष्ठा घोष (Sharmistha Ghosh) नावाच्या तरुण महिला अधिकाऱ्याने Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी सुरु केली आहे. चांगली उच्च पदाची नोकरी सोडून त्यांनी हे मोठं पाऊल का उचलले या मागची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे (Inspirational Story).
शर्मिष्ठा यांच्याकडे इंग्रजी साहित्याची पदवी आहे. शर्मिष्ठा या ब्रिटीश कौन्सिलमध्ये मोठ्या पदावर कार्यकरत होत्या. मात्र, त्यांनी आपल्या नोकरीवर पाणी फेरले आहे. दिल्लीतील कैंट परिसरातील गोपीनाथ मार्केटमध्ये शर्मिष्ठा घोष यांचा चहाचा स्टॉल आहे. भारतीय सेनेचे ब्रिगेडियर संजय खन्ना दिल्लीत असताना त्यांना शर्मिष्ठा घोष यांचे चहाचे दुकान दिसते. यानंतर शर्मिष्ठा घोष यांची प्रेरणादायी कहानी सर्वांसमोर आली आहे. संजय खन्ना यांनी शर्मिष्ठा घोष यांच्या चहाच्या स्टॉलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत असं संजय खन्ना यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
संजय खन्ना यांनी शर्मिष्ठा घोष यांच्याशी संवाद साधून त्यांची प्रेरणादायी कहानी जाणून घेतली. शर्मिष्ठा घोष या ब्रिटिश काउंसिलमध्ये नोकरी करत होत्या. मात्र, त्यांना काहीतरी वेगळं निर्माण करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. स्टार्टअपकडून प्रेरणा घेवून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
मैत्रिण भावना राव सोबत पार्टनशिप करत शर्मिष्ठा घोष यांनी चहाचा स्टॉल सुरु केला. त्यांच्याघरी काम करणाऱ्या नोकरालाच त्याने या चहाच्या स्टॉलवर नोकरीला ठेवले आहे. हा चहाचा छोटा स्टॉल त्यांना एक ब्रँड म्हणून डेव्हलप करायचा आहे. आपल्या चहाच्या स्टॉलच्या अनेक ठिकाणी फ्रेंचाईजी असाव्यात असे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी त्या खून मेहनत घेत आहेत. नक्कीच एक दिवस चहाच्या कॅफेचा मोठा ब्रँड निर्माण करु असा विश्वास शर्मिष्ठा घोष यांनी व्यक्त केला.
सोशल मिडीयावर सध्या अनेकांच्या Inspirational Story व्हायरल होत असतात. वेगळं काही तरी करण्याच्या जिद्दीतून अनेकजण वेगळ्या वाटा निवडतात तर अनेकजण चांगल्या नोकरीचा त्याग करतात आणि स्वत:च स्टार्टअप सुरु करतात. अनेक जण यात यशस्वी देखील झाले आहेत.