Shraddha Jain Meets Narendra Modi: तंत्रज्ञान क्षेत्रात सुरु असलेल्या नोकरकपातीवरील (Mass Layoff) व्हिडीओमुळे व्हायरल झालेली Instagram Influencer श्रद्धा जैनने (Shraddha Jain) नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली. हा आपल्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. श्रद्धा जैन 'Aiyyo Shraddha' नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धा जैनला पाहिलं तेव्हा तिला "Aiyyo" म्हणत हाक मारली. ही हाक ऐकून श्रद्धा जैनलाही आश्चर्याचा धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LinkedIn वर श्रद्धा जैनचे 83 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे Instagram वर 6.88 लाख फॉलोअर्स आहेत. श्रद्धा जैन सोशल मीडियावर नेहमी रोजच्या घडामोडींवर आधारित व्हिडीओ शेअर करत असते. हे व्हिडीओ युजर्सच्या पसंतीला पडत असतात. 


"नमस्कार, हो, मी देशाच्या पंतप्रधानांना भेटले आहेत. त्यांचा पहिला शब्द 'अय्यो' होता. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. खऱचं ते म्हणाले आहेत. खरंच असं घडत आहे. धन्यवार नरेंद्र मोदीजी," अशी पोस्ट श्रद्धाने Instagram ला शेअर केली आहे. 



फोटोमध्ये श्रद्धा जैन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी उभी असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या फोटोत कन्नड अभिनेते यश आणि ऋषभ शेट्टीही दिसत आहेत. 


"खोलीत गेल्यानंतर मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यावर ते 'अय्यो' म्हणाले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ज्याप्रकारे आपल्या देशाचं सौंदर्य दाखवत आहे ते पाहता आपल्याला किती अभिमान वाटत आहे याबद्दल त्यांनी सांगितलं," अशी माहिती श्रद्धा जैनने दिली आहे. श्रद्धा जैनच्या फोटोला एका तासातच 75 हजार लाईक्स मिळाले होते. 


श्रद्धा जैनने गेल्या महिन्यात नोकरकपातीवर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला होता, ज्यामध्ये उद्योजक हर्ष गोएंका यांचाही समावेश होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shraddha (@aiyyoshraddha)


श्रद्धाने व्हिडीओत नोकरीवरून काढून टाकलेल्या टेक कर्मचाऱ्याची भूमिका निभावली होती. लाखोंचा नफा मिळवूनही कर्मचार्‍यांना सोडून देणाऱ्या टेक कंपन्यांची तिने निंदा केली.